ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला

ठाणे: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४ वर्षाखालील मुलांसाठी ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रिकेट सामना २०२५ -२६ साठीचा अंतिम सामना शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे झाला. श्री माँ विद्यालयाने वसंत विहार शाळेला पराभूत करत चषकावर आपले नाव कोरले.

वसंत विहार शाळेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वसंत विहार ने सर्व बाद १२८ धावा केल्या. तर श्री माँ विद्यालयाने २ गडी राखून विजय मिळविला. सामन्यात ४४ धावा व १ गडी बाद करण्याऱ्या श्री माँ विद्यालयाचा ध्रुव सोनार सामनावीर चा मानकरी ठरला.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, मा. सचिव अभय हडप, सदस्य नदीम मेमन, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू व प्रशिक्षक विलास गोडबोले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते चषक देण्यात आला आणि खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे कौशिक गोडबोले आणि डॉ. नम्रता ओवळेकर- राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

उपविजयी वसंत विहार संघाला ॲड. शरद (बाबा) चिटणीस चषक, ध्रुव सोनार याला सतीशचंद्र प्रधान मालिकावीर चषक, ॲड. सदानंद भिसे सर्वोत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी मानव पोकर याला, किशोर ओवळेकर सर्वोत्कृष्ट गोलंदाज चषक तनिश साळी याला, चिंतामणी वैद्य सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक विहान सरमळकर याला, सुलक्षण कुलकर्णी सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक चषक श्लोक हवाले याला, दिलीप रणदिवे सामनावीर चषक ध्रुव सोनार याला तर उपविजेतेपदके बाळाराम राजाराम नाखवा यांच्या नावाने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *