गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर निवडणूक लढवा -डॉ.श्रीकात शिंदे
अनिल ठाणेकर
ठाणे, गणेश नाईक यांना एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी.
भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. असे थेट खुले आव्हान देखील यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले.
