हेरिटेज वास्तूंची डागडुजी परवानगीविना होत असल्याने शिवराष्ट्र पॅनेलचे गटनेते सिताराम कुंभार संतप्त
मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरान मध्ये असणाऱ्या हेरिटेज वास्तूंच्या डागडुजी किंवा नूतनीकरण करावयाचे असल्यास हेरिटेज कमिटीच्या परवानगी शिवाय कोणतेही काम करता येत नाही.एखाद्या निकृष्ठ रस्त्याचे काम करावयाचे झाल्यास या कामाला हेरिटेज कमिटीची परवानगी लागते अशी उत्तरे दिली जातात.परंतु माथेरान नगरपरिषदेच्या हेरिटेज कार्यालयाचे काम विना परवानगी सुरू असल्यामुळे याबाबत शिवराष्ट्र पॅनेलचे गटनेते सीताराम कुंभार यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट उत्तर न दिल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करावी अशी सिताराम कुंभार यांनी मागणी करून प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
माथेरान नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट असताना अशाप्रकारे कामे सुरू केली आहेत.यावर आळा बसला पाहिजे.जर का या कामाच्या परवानग्या घेतलेल्या असतील तर आम्हाला दाखवून विश्वासात घेऊन कामे सुरू करणे आवश्यक होते.माथेरान मध्ये अनेक हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या डागडुजीची कामे सुध्दा मोठया प्रमाणात सुरू आहेत.त्यामुळे हा एकप्रकारे हेरिटेज स्कॅम असून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे नाकारता येत नाही हा स्कॅम आम्हाला उघडकीस आणावयाचा असून या स्कॅममध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि दलाल मंडळींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
सिताराम कुंभार–शिवराष्ट्र पॅनेल गटनेते
माथेरान नगरपरिषद
