मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी मुंबईकर वापरत असलेले युटीएस ॲप आता बंद होणार आहे. येत्या १ मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे. सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे २८ फेब्रुवारीनंतर सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत.
भारतीय रेल्वेने युटीएस ॲप २७ डिसेंबर २०१४ मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आला. मुंबई लोकलचं तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. पण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना रेलवन या ॲप RailOne कडे वळावे लागणार आहे. एक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता १ मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै २०२५ मध्ये RailOne ची सुरुवात केली होती.
