सिंधुदुर्गात ७० ग्रामपंचायतींवर आता प्रशासक…!
मुदत संपली, निवडणुकीची प्रतिक्षा.!
सिंधुदुर्ग – राजन चव्हाण
जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने आता त्यावर प्रशासक नेमण्यात आले आहे. १० व ११ फेब्रुवारी रोजी या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी त्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश जारी केले असून आता निवडणुका होईपर्यंत या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक पहाणार आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक २३ ग्रामपंचायती या देवगड तालुक्यात आहेत. त्याखालोखाल वैभववाडी- १३, सावंतवाडी -११, कुडाळ-९, मालवण-६, कणकवली व दोडामार्ग प्रत्येकी -३ तर वेंगुर्ला तालुक्यात- २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
