योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा

 

मुंबई: योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच बॉम्बे जिमखाना येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेतील ६५ वर्षांवरीील दुहेरी गटात दिलीप सुखटनकर व मिलिंद पूर्णपात्रे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य उपविजेतेपद पटकावले.

उपांत्य फेरीत गौतम आश्र व महेश आरस यांनी अनिल भंडारी व सुनील पुंडलिक यांचा २१-१९, २१-१५ असा सरळ दोन डावांत पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत दिलीप सुखटनकर व मिलिंद पूर्णपात्रे यांनी भरत पाटील व जॉर्ज मनगडील यांच्यावर २१-१६, १७-२१, २२-२० असा अत्यंत चुरशीचा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या डावात दोन्ही संघांमध्ये शेवटपर्यंत रोमांचक लढत झाली.

अंतिम फेरीत गौतम आश्र व महेश आरस यांनी आक्रमक आणि अचूक खेळाचे प्रदर्शन करत दिलीप सुखटनकर व मिलिंद पूर्णपात्रे यांचा २१-११, २१-१७ असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.

००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *