म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी

१७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

या सदनिका पूर्वी सोडतीत जाहीर झाल्या होत्या; मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा यात समावेश आहे. इच्छुकांनी https://bookmyhome.mhada.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी.

ऑनलाइन अर्ज, अनामत रक्कम व अर्ज शुल्क भरणा तसेच सदनिका निश्चितीची प्रक्रिया ४ मार्च २०२६ पासून सुरू होईल. सदनिका निश्चित केल्यानंतर ४८ तासांत विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा करणे बंधनकारक राहील; अन्यथा दावा रद्द होणार आहे.

कांदिवली (शिंपोली, चारकोप), वडाळा, पवई, मानखुर्द, मालाड, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन तसेच जुहू-अंधेरी परिसरातील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे व महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.

म्हाडाने कोणताही दलाल नियुक्त केलेला नसून सर्व व्यवहार अधिकृत संकेतस्थळाद्वारेच करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *