कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई; २० हजारांचा दंड वसूल
नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कोपरखैरणे विभागातील सुभद्राबाई भगवान आव्हाड (एस.एस. टाईप, रूम क्र. ९८३, सेक्टर-३) तसेच शैतान सिंग चौहान व मनोहर कंवर (एस.एस. टाईप, रूम क्र. ५७९, सेक्टर-३) यांच्या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संबंधित बांधकामांवर अंशतः तोडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात प्रत्येकी १०,००० रुपये असा एकूण २०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या तोडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत ऊ. धांडे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी आणि न.मुं.म.पा. पोलीस बंदोबस्त उपस्थित होता. कारवाईदरम्यान ८ मजूर, २ इलेक्ट्रॉनिक हॅमर आणि १ गॅस कटरचा वापर करण्यात आला. अनधिकृत बांधकामांविरोधातील अशी कारवाई पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *