२०वी राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

मुंबई : २० व्या राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा नुकत्याच मुंबईत वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या भारतीय क्रीडा मंदिरात उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. सिनियर, ज्युनियर, सब ज्युनियर व मिनी गटाच्या विविध स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन मुंबई शहर जिल्हा जिम्नास्टिक्स असोसिएशन, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व त्यांचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांनी संयुक्तपणे केले होते. महाराष्ट्र हौशी जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यातील सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पंच, प्रशिक्षकांनी स्पर्धेचे शिस्तबध्द संचलन केले. महाराष्ट्रातल्या १९ जिल्ह्यांतील एकूण २५० पेक्षा जास्त पुरुष व महिला खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. ठाणे, संभाजी नगर, मुंबई शहर, रायगड, परभणी व नांदेड जिल्ह्याच्या खेळाडूंचे स्पर्धेवर वर्चस्व राहिले. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलपिक असोसिएशन चे महासचिव संजय शेटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्य संघटनेचे खजिनदार आशिष सावंत, प्राचार्य डॉ जी ढोकरट उपस्थित होते. बक्षीस वितरण मुंबई उपनगर जिमनॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजितसिंग राठोड महाराष्ट्र हौशी जिमनॅस्टिक सचिव डॉ. मकरंद जोशी, मुंबई शहर जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशन सचिव डॉ. डी डी शिंदे, खजिनदार डॉ राजेंद्र शेळके व उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख अजय मापुस्कर तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पवन भोईर, अजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सिनियर गटात चार पैकी ठाणेकर खेळाडू दक्ष पाटील, राही पाखले व मानस घोडेकर यांनी तीन सुवर्ण पदके जिंकून वर्चस्व मिळवले तर चौथे सुवर्ण पदक रायगडच्या रुजूल घोडके हिने पटकाविले.

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे

ट्रम्पोलीन सिनियर गट : पुरुष – सांघिक- प्रथम -ठाणे, द्वितीय-क्रीडा प्रबोधिनी,पुणे, तृतीय- परभणी. सर्वांगीण विजेतेपद- प्रथम- दक्ष पाटील ठाणे, द्वितीय- अभिषेक शिंदे, क्रीडा प्रबोधिनी, पुणे, तृतीय- अजय पहुरकर, संभाजी नगर

महिला

सर्वांगीण विजेतेपद- प्रथम-राही पाखले, द्वितीय- माऊली बहल, (दोघी ठाणे), तृतीय – सई दळवी, मुंबई शहर

सांघिक प्रथम- ठाणे, द्वितीय- परभणी तृतीय- जळगाव

टमब्लिंग पुरुष

सर्वांगीण विजेतेपद- प्रथम- मानस घोडेकर ठाणे, द्वितीय- जुनेद शेख, परभणी, तृतीय- कैवल्य पुजारी, नांदेड

सांघिक-प्रथम-परभणी, द्वितीय-ठाणे तृतीय-नांदेड

महिला

सर्वांगीण विजेतेपद-

प्रथम-रुजूल घोडके, रायगड, द्वितीय- सौख्या घेवारे, पुणे तृतीय- कृत्तिका नरवडे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *