– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा
डेटामॅटिक्स एससीचा मोठा विजय
मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या (२०२५-२६) साखळी सामन्यात डेटामॅटिक्स एससीने ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स क्लबवर ३२ धावांनी विजय मिळवला.
डेटामॅटिक्स एससीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९१ धावांची मजल मारली. शशांक जाधवने ५६, नितेश रायने नाबाद ४१ धावा करत संघाला दोनशेच्या घरात पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स क्लबला २० षटकांत ७ बाद १५९ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून साजिद खान (४१) आणि सुशांत वाजेने (नाबाद ३८) थोडा प्रतिकार केला. मात्र, अथर्व चव्हाण (२/१५) आणि नितीश रायसह (२/२८) सर्व प्रमुख गोलंदाजांनी अचूक मारा करताना डेटामॅटिक्स एससी संघाला मोठ्या फरकाने जिंकून दिले.
संक्षिप्त धावफलक: डेटामॅटिक्स एससी – २० षटकांत ६ बाद १९१ (शशांक जाधव ५६, नितेश राय ४१*, यतिन माधवी २८*, भुवन पाटील २४; आयुष निषाद ३/४४) वि. ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स क्लब – २० षटकांत ७ बाद १५९ (साजिद खान ४१, सुशांत वाजे ३८*, शोएब अन्सारी २९*, मानव सिंघवी २२; अथर्व चव्हाण २/१५, नितीश राय २/२८). निकाल: डेटामॅटिक्स एससीने ३२ धावांनी विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *