फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रान मुंबईच्या रस्त्यावर धावले…
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सुरक्षेचे सारे संकेत धुडकावत मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या रस्त्यावर जॉगिंग केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईच्या रस्त्यावर धावतांना दिसताच मुंबईकरांनी अचंबित होत त्यांचे फोटो काढले आणि व्हिडीयो शुट केले. मॅक्रान यांनीही आनंदाने त्यांना पोझ देत आपल्या जॉगिगंचा आनंद लुटला. मॅक्रान यांच्या दौडीचे हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले हो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मॅक्रोन यांचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम होते पण त्यापुर्वी मॅक्रान यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर जॉगिगं चा आनंद लुटला. नेव्ही ब्ल्यु टिशर्ट आणि शॉर्टस् मध्ये मॅक्रानची ही दौड टिपण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. सुरक्षेचे सारे संकेत पाळत आणि आपल्या दौडीचा मुंबईकरांना कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेत मॅक्रॉन यांनी आपली दौड पुर्ण केल्याचा विशेष उल्लेक नेटीजन्सनी आपल्या पोस्टमध्ये आवर्जून केला.
