२१ फेब्रुवारीला नवलेखक कार्यशाळेचे आयोजन
ठाणे: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व अनघा प्रकाशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय नवलेखक कार्यशाळेचे (कवितालेखन) आयोजन शनिवार २१ फेब्रुवारीला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत कात्यायन सभागृह, तिसरा मजला, वाणिज्य शाखा इमारत, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे (प.) या ठिकाणी करण्यात आले आहे.
या कार्यशाळेसाठी मान्यवर ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर (छंदोबद्ध कविता), ज्येष्ठ कवी अशोक बागवे (आषय आणि अभिव्यक्ती) आणि ज्येष्ठ कवी सतीश सोळंंकुरकर (मुक्तछंद कविता) याविषयांवर मार्गदर्शन करणार असून इच्छुक नवोदित कवी ज्यांचे एकही पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व सदर कार्यशाळेसाठी आपली नावे खाली दिलेल्या नंबर वर नोंदवावीत जेणेकरून आपल्याला सदर कार्यशाळेचा लाभ घेता येईल असे आवाहन अनघा प्रकाशनचे संचालक अमोल नाले यांनी केले आहे. नाव नोंदणी तसेच कार्यशाळेसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही याची कृपया इच्छुकांनी नोंद घ्यावी. फक्त २० जणांसाठी जागा उपलब्ध आहेत. तरी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन अमोल नाले (९७६९६०३२३९) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *