महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण
प्रभारी नियुक्त्या रद्द करण्याची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता ठाणे महानगर पालिकेकडून केली जात नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे रवींद्र चांगो शिंदे यांनी ठामपा मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
ठाणे महानगर पालिकेची सुमारे चार वर्षानंतर सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी, कर्मचारी थकीत देणी त्वरीत द्यावी, १०-२०-३० ची ठरावाची त्वरीत अंमल बजावणी करावी, शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभार रद्द करावा, शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभारी पदे रद्द करावेत, महात्मा फुले खारटन रोड क्रिक रस्त्याचा १० वर्षांचा प्रलंबीत ठराव, तत्काळ मंजुर करावा आदी मागण्यांचे निवेदन रवींद्र शिंदे यांनी ठामपाला दिले.
