ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ रद्द

टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल

न्युयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर लागू केलेले सर्व आयात शुल्क (टॅरिफ) बेकायदेशीर असल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार ट्रम्प यांचे सर्व टॅरिफ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत असताना घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जागतिक पातळीवर मोठी चर्चा झाली होती. विशेषतः ट्रम्प यांचे आयात शुल्क (टॅरिफ) धोरण हे जगभरातील अनेक देशांसाठी धक्का देणारे ठरले होते. विविध देशांवर टॅरिफ लादण्याची धमकी देणे आणि प्रत्यक्षात कडक आयात शुल्क लागू करणे, हे ट्रम्प यांच्या कार्यकाळातील वैशिष्ट्य ठरले होते.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. राष्ट्राध्यक्षांना एकतर्फी पद्धतीने टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ६-३ अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण अवैध ठरवले आहे.

या निर्णयामुळे जागतिक व्यापारावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अडचणीत आलेल्या अनेक देशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *