ओलेक्ट्रा ग्रीनटेकला इ बसची मोठी ऑर्डर

१,०८५ इलेक्ट्रिक बसेसची १,८०० कोटींचे टेंडर मिळाले

मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात  महत्वाचा सहभाग असणारी हैद्राबादची कंपनी  ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला (Olectra Greentech) तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (TGSRTC) १,०८५ इलेक्ट्रिक बसेससाठी तब्बल १,८०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या ऑर्डरमध्ये १,०२५ नॉन-एसी आणि ६० एसी बसेसचा समावेश आहे. या सर्व १२-मीटरच्या बसेस शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जातील. हा करार १२ वर्षांच्या कालावधीसाठी असून तो GCC (Gross Cost Contract) मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल ओलेक्ट्रा कंपनी करणार आहे. पुढील २० महिन्यांत या सर्व बसेसचा पुरवठा पूर्ण केला जाईल. गेल्या ३ वर्षात १५९% परतावा देणाऱ्या या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आता मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे शेअर बाजारतही या कंपनीची शेअर वर जाण्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *