६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ दिमाखात संपन्न
पुण्याचे चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव ठरले सर्वात वेगवान जलतरणपटू
महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ३३७ जलतरणपटूंचा जल्लोष
मुंबई (क्री. प्र.) : ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ स्पर्धा जल्लोषात पार पडली! अथांग अरबी समुद्राच्या थरारक लाटांवर जिद्द, वेग आणि सहनशक्तीचा अफलातून संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्रासह ६ राज्यांतील तब्बल ३३७ जलतरणपटूंनी गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने समुद्राला आव्हान दिले. त्यापैकी ३३० जलतरणपटूंनी हि स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केली. पुण्याच्या चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव यांनी सर्वात वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावत स्पर्धेवर आपली ठसठशीत छाप उमटवली. आठ गटांमध्ये मुलं-मुली, पुरुष-महिला आणि दिव्यांग खेळाडूंनी लाटांवर वर्चस्व गाजवत जलतरणाचा खरा महोत्सव रंगवला.
वेगाचा विजेता ठरले पुण्याचे तारे
चैतन्य शिंदे व दीक्षा यादव यांची सुवर्ण झेप
पुरुष गटात पुण्याचा चैतन्य शिंदे – ३९:१५ मिनिटांत सुवर्ण, सुरतचा युग अजय भाई सायलर – ४०:०३ मि. रौप्य आणि नाशिकचा वरद घनश्याम कुवर – ४०:४९ मि. कांस्य.
१६ ते २५ वर्षे (५ किमी) महिला गटात पुण्याची दीक्षा यादव – ३९:३३ मिनिटांत सुवर्ण, तर सिंधुदुर्गची पूर्वा संदीप गावडे – ४१:१६ मि. रौप्य आणि नागपूरची संजना सुनील जोशी – ४३:२२ मि. कांस्य.
दिव्यांग गटात जिद्दीची कमाल (१ किमी)
महिला: नाशिकची विभूती युवराज पाटील – १२:५३ मि. प्रथम, नागपूरची मंत्रा पराग खुळे – २६:०३ मि. द्वितीय, नाशिकची गार्गी तुषार कुवार – २८:५४ मि. तृतीय.
पुरुष: बेळगावचा स्कंद राहुल घाडगे – १०:०९ मि. प्रथम, मुंबईचा आदि समित गोसार – १०:३६ मि. द्वितीय, मुंबईचा ऋग्वेद दत्तात्रय सुर्वे – १२:२८ मि. तृतीय.
२६ ते ४५ वर्षे (५ किमी) गटात दमदार कामगिरी
महिला: हुगळीची तुली बॅनर्जी – ५०:४० मि. प्रथम, मुंबईची मृण्मयी भोईर – १:१५:०४ द्वितीय, सोलापूरची दिपाली जक्कल – १:२४:०७ तृतीय.
पुरुष: ठाण्याचा विवेक वामन शिसवे – ४७:०६ मि. प्रथम, वडोदऱ्याचा पटेल जैमीन राजेश – ५२:०७ मि. द्वितीय, मुंबईचा गौरांग अरविंद पटेल – ५५:५९ मि. तृतीय.
४६ ते ५५ वर्षे (२ किमी) गटात अनुभवाचा जलवा
महिला: आरती डागा – १९:५९ मि. प्रथम, मुंबईची शीतल भागवत – २३:०५ मि. द्वितीय, मुंबईची प्रिती चव्हाण – ३७:०१ मि. तृतीय.
पुरुष: मुंबईचा सुखबिंदर सिंग – १७:११ मि. प्रथम, मुंबईचा अजित सदाशिव पवार – १७:४२ मि. द्वितीय, पुण्याचा विकास जगन्नाथ देसाई – १८:०० मि. तृतीय.
१४ ते १५ वर्षे (५ किमी) गटात नवोदितांचा थरार
मुले: सोहम स्नेहल खांबेकर – ४०:४३ मि. तनय तुषार लाड – ४०:५६ मि. निरंजन संदीप यादव – ४१:०८ मि..
मुली: प्रिशा वर्मा – ४४:४२ मि., हर्षदा विनय चौधरी – ४५:१७ मि., अतश्री भोसले – ४५:१९ मि..
१२ ते १३ वर्षे (२ किमी) गटात तेजस्वी झळाळी
मुले: रायगडचा क्रिश विजय कुठे – १४:११ मि., अबीर मांडवकर – १४:२१ मि., अभीर साळसकर – १४:३२ मि.
मुली: ओवी सिद्धेश चिंदरकर – १४:३८ मि., गितीशा प्रवीण भंडारे – १४:४१ मि., विधी नंदकुमार भोर – १५:३८ मि.
८ ते ९ वर्षे (१ किमी) गटात चिमुकल्यांची झेप
मुले: बेळगावचा हर्षवर्धन केतन कारलेकर – १०:३२ मि., ठाण्याचा सिद्ध मुप्पिनेटी – ११:२६ मि., रांचीचा इशांक सिंग – ११:२८ मि..
मुली: दुर्वा तुषार कुरणकर – १०:२० मि., चंद्रपूरची अबिया तुकाराम डावर – ११:३३ मि., सान्वी घाटकर – ११:४४ मि.
जलतरणपटूंच्या नजरेतून ‘ऑलिंपिक’चे स्वप्न
दीक्षा यादव: “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकणे आणि २०३६ ऑलिंपिकसाठी पात्र ठरणे हेच माझे ध्येय.”
चैतन्य शिंदे: “हे माझे सी-स्विमिंगमधील चौथे सुवर्ण. देशासाठी सुवर्ण मिळवणे हे अंतिम स्वप्न.”
स्कंद राहुल घाडगे: पॅरा गटातून नॉर्मल गटात झेप घेण्याची जिद्द.
महादेव भगवान तावरे (७० वर्षे): “सातत्य हेच फिटनेसचे रहस्य.”
विकास जगन्नाथ देसाई (६२ वर्षे): “तरुण असो वा वृद्ध, जलतरण हा सर्वोत्तम व्यायाम.”
बक्षीस वितरण :
स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण सोहळा सचिवालय जिमखाना येथे पार पडला. त्यावेळी सभागृह खचाखच भरले होते. बक्षीस वितरण खासदार अरविंद सावंत, पद्मश्री उदय देशपांडे, अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळ वाडवलिकर, द्रोणाचार्य तपन पाणीग्रही, क्रीडा संघटक बाळ तोरसकर यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी आयोजक व खेळाडूंचे कौतुक करून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे पार पडले. १९४० पासून सुरु झालेली हि स्पर्धा राजेंद्र पालकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे सर्वांनी नमूद केले.
यशस्वी आयोजन
सपर्धा आयोजनात समीर शिरसेकर, युसुफ छोटेसरा, अरुण जगताप, कैलास आखाडे, नीलकंठ आखाडे, दिलीप कोळी, संतोष पाटील, इशिका पालकर, रूपाली रेपाळे, बरखा केडिया, छाया डोयले, किशोर वैद्य, घनश्याम कुवर, अजय फाटक, किशोर पालकर, डॉ. सचिन शिंदे, अनिल परसुरे, भास्कर कुलकर्णी यांनी मोलाचे योगदान दिले, असे सरचिटणीस राजेंद्र पालकर यांनी सांगितले.
‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्राच्या जलतरण परंपरेचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा एक भव्य जलमहोत्सव ठरला. मुंबईच्या लाटांवर झुंज देत प्रत्येक विजेत्याने सिद्ध केले ते म्हणजे समुद्र मोठा असला, तरी जिद्द त्याहून मोठी असते!
