संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे :- थोर समाजसुधारक, स्वच्छता व सामाजिक समतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, तहसीलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, तहसीलदार (संगणक/सांख्यिकी) संदीप थोरात, तहसीलदार (रेतीगट) अमोल कदम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनांच्या माध्यमातून समाजात स्वच्छता, नैतिकता आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून समाजजागृतीची चळवळ उभी राहिली.
