बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये
ठाणे -बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील बुध्द विहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. या समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला सकाळी ८ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत उल्हासनगर येथील शहीद अरूण वैद्य सभागृह, टाऊन हॉल येथे अशोक सरस्वती बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत ठाण्यात देण्यात आली. पत्रकार परिषदेला राजेश कांबळे, प्रदीप सावंत , महेंद्र बरसागडे, दिगंबर हजारे, सदानंद जाधव, प्रकाश मोर्य, मेहराताई गायकवाड, प्राची जाधव उपस्थित होते.
बुध्द विहार समन्वय समिती प्रमुख्याने बैध्द संस्कृती निर्माण करणे, बौध्द वारसा आणि बौध्द लेणी संरक्षण करणे, बौध्द संस्कार विधी मध्ये समानता आणणे, बैध्द विहारात पालि भाषा प्रचार केंद्र करणे, भिक्खू संघ आणि उपासक समन्वय करणे या उद्देशाने हे बैध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. डॉ. भदंत उपगुप्त महास्थविर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष असतील तर शामदादा गायकवाड हे उद्घाटक आहेत. मुख्य अतिथी म्हणून आकाश लामा आणि जी. मोहनन, उमेश नागदेवे आणि भेरुलाल नामा हे उपस्थित राहाणार आहे. स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रकांत साळवे आणि सुरेश त्रिभुवन आहेत. समारोप समारंभात समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध पुढील दिशा मांडतील.
डॉ. हेमलता महिस्वर या महिला चर्चासत्राच्या अध्यक्ष राहतील. देशाच्या विविध राज्यातील महिला कार्यकर्त्या त्यात सहभागी होणार आहे.डॉ. उल्हास आंबेडकर (चांदेलकर) युवा चर्चाचे अध्यक्ष राहतील. देशातील विविध राज्यातील युवक त्यात सहभागी होऊन आपले विचार मांहणार आहेत राजेश कांबळे पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन करणार असून डॉ. पल्लवी दराडे, रमेश कटके, डॉ. रवींद्र मुंद्रे, प्रा. राहुल राब, प्रा. सुधीर कांबळे त्यात सहभागी होतील.
बुद्ध विहार समितीच्या वतीने वर्षेभरात विविध सामाजिक धर्मीक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात धम्म प्रशिक्षण शिबिर, बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, पालि भाषा प्रशिक्षण शिबिर, लेणी संवर्धन, धम्म यात्रा, जापनी भाषा ऑनलाईन वर्ग इत्यादी आयोजीत करण्यात येणार आहे. समाजातील विचारवंत उपासक, उपासीका, बुद्ध विहार संचालक या सर्वांनी मोठ्या संख्या उपस्थित राहून हे अधिवेशन यशस्वी करावे असे अहवान समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध आणि राजेश कांबळे यांनी केले आहे.
