भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय

चेन्नई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६च्या सुपर ८ फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकांत ४ बाद २५६ धावांचा प्रचंड डोंगर उभारला आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. पण त्याचबरोबर भारताचा पुढचा सामना हा वेस्ट इंडिज संघाबरोबर आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा आजचा विजय हा भारतीय संघासाठी नक्कीच आत्मविश्वास देणारा ठरलाय हे नक्की. भारताच्या या विजयानंतर सोशलमीडियावर मात्र बचेंगे तो और भी लढेंगे हा टॅग व्हायरल झाला होता.

टॉस जिंकून झिम्बाब्वेने गोलंदाजी स्वीकारलीमात्र भारतीय फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडले. अभिषेक शर्माने २६ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावत डावाला वेग दिलातर हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ५० धावा करत शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. तिलक वर्मा १६ चेंडूत नाबाद ४४ धावा करत अखेरपर्यंत ठाम उभा राहिला. पॉवरप्लेमध्येच मोठी धावसंख्या उभी राहिल्याने झिम्बाब्वेवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला आणि भारताने स्पर्धेतील अव्वल धावसंख्यांपैकी एक नोंदवली.

२५७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात सावध झालीमात्र ब्रायन बेनेटने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजांना काही काळ ताण दिला. त्याने फटकेबाजी करत डाव शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. १८व्या षटकात हार्दिक पांड्याने अचूक यॉर्कर आणि नियंत्रित मारा करत केवळ ९ धावा दिल्या. १९व्या षटकात अर्शदीप सिंगने निर्णायक झटका देत टोनी मुनयोंगा याला अचूक यॉर्करवर ११ धावांवर बाद केले. त्या षटकात फक्त ३ धावा आणि एक बळी मिळाल्याने झिम्बाब्वेची आशा संपुष्टात आली. १९ षटकांनंतर झिम्बाब्वेची धावसंख्या १६४/५ अशी झाली होती.

अखेरचे षटक शिवम दुबेने टाकले. त्या वेळी बेनेट ८६ धावांवर खेळत होता आणि शतकाच्या उंबरठ्यावर उभा होता. पहिल्याच चेंडूवर त्याने एकेरी घेतली. पुढील चेंडू नो-बॉल ठरला आणि फ्री-हिटवर ताशिंगा मुसेकिवाने षटकार ठोकलामात्र लगेचच लाँग-ऑनवर संजू सॅमसनने घेतलेल्या अप्रतिम झेलामुळे मुसेकिवा ७ धावांवर बाद झाला. बेनेटने त्यानंतर षटकार आणि चौकार ठोकत शतकाच्या दिशेने झेप घेतलीपण तो ५९ चेंडूत ९७ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या षटकात २० धावा मिळाल्यातरी सामना भारताने ७२ धावांनी जिंकला.

फलंदाजांची आक्रमकता आणि गोलंदाजांची अचूकता यांचा उत्तम संगम साधत भारताने हा सामना एकतर्फी केला. ब्रायन बेनेटची ९७ धावांची झुंजार खेळी उल्लेखनीय ठरलीमात्र भारताच्या सर्वांगिण आणि शिस्तबद्ध कामगिरीपुढे ती अपुरी पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *