कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी…!
पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना….!
कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील ग्रामस्थ आणि रुंग्णांनी आपला सक्रीय सहभाग नोंदविला आणि शिबीर यशस्वी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुंग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आज दिवसभर कणकवली शहर आणि तालुक्यातील ग्रामस्थ आणि रुग्णांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवित शिबीर यशस्वी केले. तालुक्यातील काही दुर्गम भागातून ग्रामस्थ आणि रुंग्ण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तपासणीसाठी आलेल्या काहींच्या गुंतागुंतीच्या गाठीच्या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ करण्यात आल्या.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलीमा इनामदार यांनी या कामी सहकार्य केलं.
आदरणीय सर
कणकवली उपजिल्हा रुंग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती
धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आला.
या महाआरोग्य शिबिराच्या दरम्यान एकूण ११३४ लाभार्थींना ह्रदयरोग, शल्यचिकित्सा, पोटाचे विकार, स्त्रीरोग तज्ञ, कर्करोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बालअस्थिरोग तज्ञ , मूत्रविकार तज्ञ ,कान नाक घसा तज्ञ आदी तज्ञ डॉक्टर्स मार्फत सेवा देण्यात आल्या.
शिबिरात दिवसभरात यु एसजी -१५२,सी.टी.स्कॅन -६४,रक्त तपासण्या ७५४,’ टूडी-इको’-११९,एक्स -रे -1,इसीजी -122 आदी तपासण्या करण्यात आल्या.
या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर गंभीर आजार असलेले रुंग्ण आढळल्यास त्यांच्यावर ओरोस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुंग्णालय किंवा मुंबई -पुण्यात पुढील उपचार करण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *