केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन आज करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेत महापौर हर्षाली चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील  इतर पालिका सदस्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली तर डोंबिवली पूर्वेत महापालिका कार्यालयानजीकच्या परिसरात उपमहापौर राहुल दामले व इतर पालिका सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सह १०० पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला.

महापालिकेच्या प्रभागांतही मनपा स्वच्छता अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच पालिका सदस्य यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आमदार राजेश मोरे व सुलभा गायकवाड यांनी देखील इतर पालिका सदस्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरील कचरा, धुळ ,माती साफ सफाई करून घंटागाडी,डंपर मार्फत संकलित करण्यात आली. सुमारे १७५८० किलो ओला कचरा आणि ४६९९६ सुका कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जवळपास ४००० सदस्य व महापालिकेचे जवळपास १००० कर्मचारी तसेच पालिका सदस्य सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *