रमेश औताडे
मुंबई : प्रत्येक हृदय शस्त्रक्रियेमागे एक डॉक्टर टीम असते आणि त्या टीमच्या केंद्रस्थानी परफ्यूजनिस्ट (संजीवनी तज्ञ) असतो, जो पेशंटचे  हृदय  चालू आहे की नाही याची खात्री करत असतो. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर टीम निघून जाते. मात्र परफ्यूजनिस्ट (संजीवनी तज्ञ) पेशंट शुद्धीवर येईपर्यंत असतो. त्यांची सध्या देशात संख्या फार कमी आहे. ती कशी वाढेल यासाठी इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्राकॉर्पोरियल टेक्नॉलॉजीची २६ वी वार्षिक परिषद मुंबईत सुरू झाली आहे.
इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्राकॉर्पोरियल टेक्नॉलॉजी ची २६ वी वार्षिक राष्ट्रीय परिषद आघाडीच्या कार्डियाक केअर तज्ञ, परफ्यूजनिस्ट, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू झाली. परिषदेचे नेतृत्व आय एस इ सी टी चे अध्यक्ष राजेंद्र कोकणे  लोकनाथ तिवारी, जगन्नाथ काळुगडे, विकास माळी, रवींद्र सावर्डेकर, शशिकांत मेमाणे, योगेश लुडबे, रफिक शेख, आयसेक्टॉनचे सचिव रवींद्र सावर्डेकर यांच्यासह वरिष्ठ कार्यकारी सदस्य करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *