ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप निवड स्पर्धा २०२५-२६ मध्ये ठाण्याच्या उदय गायकवाड आणि अविनाश गोडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड मिळवली आहे. या निवड स्पर्धा नाशिक व मुंबई येथे पार पडल्या.
५५ वर्षांवरील दुहेरी गटात उदय गायकवाड व अविनाश गोडे या जोडीची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा १८ मार्च २०२६ ते २५ मार्च २०२६ दरम्यान गोवा येथे होणार आहेत.
याशिवाय, उदय गायकवाड यांची ५५ वर्षांवरील एकेरी गटातही निवड झाली आहे. तसेच अविनाश गोडे यांची ५५ वर्षांवरील मिश्र दुहेरी गटात पुण्याच्या दीपाली जोशी यांच्या साथीने महाराष्ट्रातून निवड झाली आहे.
ठाणे शहरातील या दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही निवड मिळवली असून, त्यांच्या कामगिरीबद्दल क्रीडा वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
