शैलेश पाटील यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार
दिवा :  गेले अनेक दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची सोशल मिडीयावार वारंवार बदनामी केल्या प्रकरणी येथील गणेश पाटील यांच्या विरोधात ठामपाचे प्रभाग क्र.२७ चे नगरसेवक शैलेश पाटील यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात वारंवार बदनामी केल्याप्रकरणी संतापही व्यक्त केला आहे.
शैलेश पाटील हे दिवा शहरातील तीन टर्म मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले ठाणे महानगरपालिकचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी आज आपल्या  वरिष्ठ नेत्यांवर सोशल मिडीयावरील वारंवार होणारी बदनामी सहन न झाल्याने मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गणेश निळकंठ पाटील हे वारंवार फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विविध प्रकारे आरोप करीत कार्यकर्त्यांच्या भावाना दुखावतील असे लिखाण करीत आहेत.
एकनाथ शिंदे हे मुक्ता बिल्डरला हाताशी धरुन येथील कांदळवन बुजवण्यास सांगून बिल्डींगचे काम करण्यास सांगत आहेत. खाडी बुजवून मुक्ता बिल्डरला बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देत आहेत. गाववाल्यांच्या जमीनी बळकावित आहेत. कांदळवन आणि खाडी बुजविण्याचे काम करीत आहेत. तसेच हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या शिव हनुमान मंदिरही पाडण्यास एकनाथ शिंदेच सांगत आहेत. तसेच गणेश पाटील यांचे स्वताचे घर पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नोटीस पाठवित आहेत, असे विविध आरोप आणि आक्षेपार्ह लिखाण गणेश निळकंठ पाटील यांनी सोशल मिडीयावर केल्याचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नगरसेवक शैलेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव येथील हनुमान मंदिर पाडण्याच्या कामात मुद्दाहून आणि वारंवार घेत असून लोकांमध्ये धार्मिक भावना भडकविण्यासाठी गणेश पाटील हे मुद्दामहून प्रयत्न करीत आहे, लोकांमध्ये अफवा पसरवून उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे नाव मुद्दामहून बदनाम करण्यासाठी फेसबुक सारख्या सोशल मिडीयाचा वापर करीत आहेत.
येथील मुक्ता बिल्डरच्या प्रविण पाटील यांच्याशी कोणतेही सबंध नसताना वारंवार सोशल मिडीयावर वारंवार बदनामी करुन जनतेच्या भावनाही भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आज आम्ही मुंब्रा पोलीसांत तक्रार दाखल करुन सबंधित गणेश पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे शैलेश पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *