मिरा-भाईंदर : मीरा भाईंदर महानगर पालिका यांच्या सौजन्याने तसेच मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्या वतीने शहरातील मा. महापौर, मा. उपमहापौर, मा. नगरसेवक आणि विविध स्तरावर पदक प्राप्त कुस्तीगीरांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मिरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता उपस्थित होत्या. त्यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन श्रीमती सुनंदा माने यांनी सत्कार केला. उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा सत्कार वरिष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला.
नगरसेवक भगवती शर्मा यांचा सत्कार आखाड्याचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील यांनी केला. नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांचा सत्कार वस्ताद रूपचंद माने यांनी केला. नगरसेविका आकांक्षा वीरकर यांचा सत्कार श्वेता शेडगे यांनी, नगरसेविका किमया रकवी यांचा सत्कार अश्विनी खैरे यांनी, तर नगरसेविका आभा पाटील यांचा सत्कार श्वेता चौधरी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. नगरसेवक सचिन डोंगरे यांचा सत्कार वस्ताद नामदेव माटेकर यांनी, तर नगरसेवक दीपक सावंत यांचा सत्कार महापालिकेचे फायर ब्रिगेड अधिकारी सदानंद पाटील यांनी केला. या प्रसंगी विविध स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विशेष कामगिरी करणारे खेळाडू
मुंबई विद्यापीठ चॅम्पियन व ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा सहभागी:
पै. विशाल जाधव
कु. पै. कोमल पटेल
कु. मनीषा शेलार
ठाणे जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी:
पै. गणेश शिंदे
पै. सूरज माने
पै. विशाल जाधव
पै. प्रवेश यादव
पै. अनिकेत यादव
२० वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा:
कु. पै. कोमल पटेल – रौप्य पदक
पै. सूरज माने – रौप्य पदक
राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी:
कु. पै. डॉली गुप्ता
पै. आदर्श शिंदे
पै. ओम जाधव
पै. समीर बोबडे
कु. पै. स्नेहा मल्ला
तसेच कर्नाटक येथील मैसूर महोत्सव राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पै. देवेंद्र यांनी सलग दोन वर्षे रौप्य पदक पटकावले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी करत आखाड्याच्या प्रगतीचा आलेख मांडला व विकासासाठी मागण्या मांडल्या. महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कुस्तीगीरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सर्व मान्यवरांना वस्ताद रूपचंद माने यांनी फेटे बांधले. उत्कृष्ट सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.
००००००००००
