इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
अनिल ठाणेकर
ठाणे- इराण-इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी (SEOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४०/९३७२३३८८२७, ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२२५४४५३५३/०२२२५४४२८२८/०२२-२५४४३६३, मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई :९३२१५८७१४३/ ०२२-२२०२७९९०
