मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव
रमेश औताडे
मुंबई : मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती शमकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल , न्यायाधीश श्अभय आहूजा , न्यायमूर्ती शशर्मिला देशमुख , उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या समितीचे अध्यक्ष शरद साळवे, कार्याध्यक्ष रवी पवार, सचिव संजय शेलार सल्लागार चंद्रकांत बनकर खजिनदार किरण कांबळे तसेच कार्यकर्ते निलेश तायडे प्रशांत दाभाडे व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
अशाप्रकारे जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी केले. याप्रसंगी न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख म्हणाल्या ‘आज मी जी न्यायमूर्ती आहे ती केवळ या महामानवामुळे आहे. तसेच मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अभय आहूजा यांनी या तिन्ही महापुरुषाबद्दल गौरवउद्गार काढले आणि आपल्या सर्वांवर यांचे कसे उपकार आहेत त्याची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेलार यांनी तर प्रास्ताविक शरद साळवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत बनकर यांनी केले.
