रत्नागिरी : ३२- रायगड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी संजीवकुमार झा यांची नियुक्ती झाली आहे. झा यांचे येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्ह्यातील २६३- दापोली व २६४- गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पूर्व तयारीबाबत सिंह यांनी त्यांना माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनीही यावेळी पुष्पगुच्छ देऊन झा यांचे स्वागत केले.
