वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर  तोडक कारवाई

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत झोपड्यांविरोधात वाशी विभाग नवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व मा. अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व मा. उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

वाशीगाव परिसरातील सेक्टर-30 येथील केरला भवन समोरील भुखंडावर हाय टेन्शन वायरखालील नमुंमपा व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडपटटयांवर  तोडक कारवाई  करुन  एकूण 150 अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी,  अतिक्रमण पोलीस, सुरक्षा रक्षक, मजूर व 01 जेसीबी च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *