महाड क्रांती अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावर केलेल्या सामाजिक क्रांतीची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्या महाड क्रांतीचा इतिहास विद्यालय, महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी गाढे अभ्यासक असलेल्या तज्ज्ञांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या स्थापनेची घोषणा शुक्रवारी सुरू झालेल्या महाड क्रांती शताब्दी महोत्सवानिमित्त ‘ समान संधी अभियान ‘ चे अध्यक्ष सुनील कदम यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. अभ्यासक्रमात समावेशासाठी महाड क्रांतीच्या इतिहासावर आधारित धड्यांचे स्वरूप ही तज्ज्ञांची समिती निश्चित करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ प्रल्हाद जोगदंड हे या अभ्यासक्रम तज्ज्ञ

समितीचे अध्यक्ष असून प्रा. राजेश सोनावणे हे समन्वयक आहेत. या समितीमध्ये एकूण १७ अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात डॉ. मृदुल निळे, डॉ.सुंदर राजदीप, डॉ.अविनाश कोल्हे, डॉ.कृष्णा गायकवाड, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. प्रदीप वाघमारे, प्रा अतुल रणपिसे, प्रा. सुहास चव्हाण ( मुंबई ), प्रा. विजय मोहिते ( कोकण), डॉ. सुनील नरवडे (मराठवाडा ), डॉ विद्या चोरपगार,  डॉ चेतना सवाई,  डॉ . गौतम कांबळे, डॉ सुधीर जिंदे ( विदर्भ) सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती कदम यांनी पत्रकात दिली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांचा महाड क्रांती शताब्दीचा प्रारंभिक समारंभ गेल्या आठवड्यात पत्रकार भवनात पार पडला होता. त्यातून महाड क्रांतीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला अनेक संस्था – संघटनांनी पाठींबा यापूर्वीच जाहीर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *