मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले. त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी व शकुंतला उज्जैना यांना २१-११ व २१-१५ असे हरविले तर उपांत्य फेरीत त्यांना बनटिवाल सुनील व शोभा विजयन यांच्या कडून १७-२१, २१-१९ व २१-१७. अशा अत्यंत चुरशीच्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला.
