नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनातील नवा विक्रम स्थापित केला आहे. तब्बल सलग ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८,९३० दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे.

नरेंद्र मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पक्षाला विजय मिळवून दिला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी एकूण ८,९३१ दिवस पदावर राहून देशातील सर्वाधिक काळ शासन करणारे नेते म्हणून विक्रम केला आहे.

मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर ३ कोटी सबस्क्राइबर पूर्ण झाले. तसेच इंस्टाग्रामवर त्यांचे १० कोटी फॉलोअर्स असून, ते जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेत्यांपैकी एक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *