सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष
रमेश औताडे
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांच्या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने पुकारलेले ‘वर्षा’ निवासस्थानावरील आंदोलन यशस्वी झाले व सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा जल्लोष आझाद मैदानात पाहायला मिळाला.
म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो सफाई कामगार आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकले होते. यावेळी झालेल्या चर्चेत सरकारने सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शासन निर्णयाची (GR) प्रभावी अंमलबजावणी करून कामगारांना न्याय दिला जाईल, असे संकेत दिले.
अशोक जाधव यांनी स्पष्ट केले की, “आम्ही सरकारवर विश्वास ठेवून तूर्तास आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र सरकारने दिलेल्या शब्दाला सरकार जर जागले नाही तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा जाधव यांनी दिला.
