जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन
अनिल ठाणेकर
ठाणे, स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. किर्ती डोईजोडे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे या अमर क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
