लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी
आमदार अमित गोरखेंच्या प्रयत्नाला यश
मुंबई / रमेश औताडे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सावा निमित्त ठाणे, मुंबई महानगरपालिके प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिके तर्फे प्रतिवर्षी सात लाख रुपया मंजूर करणे बाबत जे समाज आंदोलन व मागण्या झाल्या त्याला आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. अशी माहिती समाजसेवक राजीव मानकर यांनी दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील महान साहित्यिक, समाजसुधारक व लोकशाहीर होते. त्यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांचे प्रश्न समाजासमोर मांडले व सामाजिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ठाणे महानगरपालिका व मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रु. सात लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात यावी अशी मागणी असणारे निवेदन दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे राजीव मानकर यांनी सांगितले.
