राजकारण्यांची बुवाबाजी
जगात ‘एपस्टीन’ आणि राज्यात ‘खरात स्टिंग’ अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. एपस्टीन वरून लक्ष वळवण्यासाठी कदाचित युद्ध सुरू झाले असे मानणारे काही तज्ज्ञ आहेत.नासिकला पकडला गेलेला कॅप्टन अशोक कुमार खरात हा गेली वीस पंचवीस वर्षे भविष्यकथन करतो आहे. जमिनी घेणे जमिनी विकणे हा व्यवसायही तो करत होता. खरातच्या डोक्यावर छत्रीची सावली धरणाऱ्या त्याच्या ट्रस्टमधील प्रमुख विश्वस्थ म्हणून मिरवणाऱ्या रुपाली चाकणकरांची हकालपट्टी खरात प्रकरणातूनच झाली. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवास धुमकेतूसारखा अचानक आणि गतिमान ठरला. पुण्यात मनपा निवडणूक हरलेल्या रुपालीताई बघता बघता त्या पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्ष आणि नंतर लागोपाठ दोन वेळा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या. अजितदादा पवारांच्या कृपादृष्टीनेच हे घडले. खरातवरून टीका झाल्यने मुख्यमंत्रायंनी तायंना आयोगाचा राजीनामा द्यायला संगितले. पण त्या अद्याप पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेतच. खरात माझा गुरु होता असे त्या सांगतात. गुरुप्रेमापोटीच त्या नासिकला वारंवार जात होत्या. सिन्नर परिसरात मीरगावात खरातने मोठी शेती प्रचंड आलीशान फार्महाऊस आणि त्याच परिसरात ईशान्येश्वर नावाने शंकराचे देवालय उभे केले होते.
कदाचित चाकणकरांच्या आग्रहानेच तिथे राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुनील तटकरे असे नेते हे जात होते. मंत्री विखे, माजी मंत्री केसरकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही पूजापाठ वगैरे करतानाचे फोटो खरातासोबत आहेत. त्यातून बरेच प्रश्न तयार होतात. गुरु हा पारखूनच घेतला पाहिजे असे तुकाराम महाराज, रामदास स्वामींसारखे संत सांगतात. प्रत्येक भक्ताने आपली श्रद्धा त्याच्या चरणावर ठेवण्याच्या आधी, गुरु हा सद्गुरु आहे की ढोंगी, भोंदू आहे हेही तपासून घ्यायला हवे.
खरात हा ज्योतिषी होता. तंत्र मंत्र करणारा होता. काळी जादू वगैरे करतच होता. त्याच्याकडे जाणारे एकनाथ सिंदे, केसरकर हे नेते अशा काळ्या जादूचे चाहते आहेत की काय का? खराताच्या सांगण्यावरूनच गौहातीच्या कामाख्या मंदिरात रेड्याचे बळी दिले गेले का ? त्या रेड्याचे शिंग शासकीय वर्षा बंगल्यामागे पुरले गेल्याचे आरोप उबाठा नेत्यांनी केले होते… पण प्रत्यक्षात सरकारने वा त्या बंगल्याचे सध्याचे रहिवासी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी शिंगा बाबत ना काही खुलासा केला, ना त्या बाबीचा इन्कार केला. खरातने बुवाबाजी करतानाच बायांना नासवण्याचे उद्योग केले व त्यानेच तो आता अधिक अडचणीत आला आहे. खरातच्या बरोबर ऑफीसमध्ये सहाय्यकाचे काम करणारा नीरज जाधवला व कुटुंबाला सध्या खास पोलीस संरक्षण दिले आहे. नासिकच्या प्रसिद्ध कॅनडा कार्नर परिसरात ऑक्स प्रॉपर्टी नावाचे कार्यालय खरात चालवायचा. तिथे जाधव त्याचा सहाय्यक म्हणून २०१९ पासून कामाला होता. इथे बसून खरातचा भविष्य कथनाचा कार्यक्रम चालायचा. जाधवला जेंव्हा खरातच्या महिलांच्या भानगडींचा संशय आला तेंव्हा त्याने तिथे खरातच्या नकळत गुप्त कॅमेरे बसवून चित्रण केले. ते पाहून जाधव स्वतःच हादरला. त्याच्याकडून पोलिसांनी ते चित्रीकरण मिळवले व त्यात पीडित महिलांना विश्वासात गेऊन दिलासा देऊन बोलते करण्याचे कम एसआय़ची करते आहे. या एसआयटीची स्थापना मुख्यमंत्री फडणवीसांनीच केली असून नासिक पोलिसांकडून सारे पुरावे एसआयटीने ताब्यात घेतले आहेत. नासिक शहरा लगत तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक मालमत्ता खरातने घेतल्या. त्यांची
किंमत किमान २००० कोट रुपये असल्याचे सांगितले जाते. यात सिन्नर, निघोज, निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी, राहता आदि ठिकाणच्या प्राईम जमिनींचा समावेश आहे. जादुटोण्यासाठी कोल्ह्याचे कान, सापाची कात, असल्या वस्तु खरात वापरत असे. अघोरी पूजा करत असे यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्राणी संरक्षण कायद्याखालीही तक्रार केली असून सर्वच बुवांच्या भविष्य कथनाचा समावेश अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात करा अशी मागणी शासनाकडे केली आहे.
आध्यात्माच्या आधारे गोर गरिबांबरोबरच शासनाची फसवणूक करणारा एक बदमाश १९८०-९० च्या दशात धुल्यात गाजला ोता. त्याचे नाव धर्मभास्कर वाघ. जिल्हा पिरषेदत मोठे फ्रॉड करून मिळालेल्या पैसा धर्माचाय नावे गोळाझाल्याचे तो भासवत राहिला. या घोटाळ्यात ७७ आरोपींविरुद्ध १५ कोटी ८२ लाखांचा अपहार केल्याचे १४ गुन्हे नोंदवण्यात आले. त्याला जन्मठेप झाली आहे. या धर्मभास्कर वाघाकडेही पूजा विधी करायला राजकीय नेते, अधिकारी येत असत. खरेतर आपल्या राज्याने जादूटोणा प्रतिबंधक कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. त्यामुळेच अशोक खरात सारख्या नीच, नराधमांचे पावते. गावागावात असे बुवा महाराज वावरत असतात. सर्वांवरच पोलिसांनी नजर ठेवण्याची त्यंना पारखून घेण्याची आवश्यकता नाही का ? चंद्रास्वामी आणि धीरेन्द्र ब्रह्मचारी हे दोन वदाग्रस्त बुवा दिल्लीच्या उच्च राजकीय वर्तुळात धमाल करून गेले. चंद्रास्वामी हा मोठा तांत्रिक मांत्रिक होता. नेमीचंद जैन नावाने जन्मलेला चंद्रास्वामी हा बाळपणीच घर सोडून पळाला. नेपाळच्या जंगलात त्याने आध्यात्मिक गुरुंच्या बरोबर तंत्र मंत्र शिकून घेतले. तो दिल्लीत वावरू लागला तेंव्हा धीरेन्द्र ब्रह्मचारीचा अस्त झाला होता. चंद्रास्वामी हा तीन तीन पंतप्रधानांचा सल्लागार म्हणून वावरला. चंद्रशेखर, व्ही पी सिंग आणि नंतर पी व्ही नरसिंहराव यांचा गुरु म्हणून तो वावरला. राजीव गांधींच्या हत्येसाठी पैसा पुरवल्याचा आरोप चंद्रास्वामीवर झाला होता. धीरेन्द्र ब्रह्मचारी हा बिहारी इसम दिल्लीत प्रस्थापित झाला. तो संजय गांधींच्या निकट वर्तुळात पोचला. योगाभ्यास नावाने त्याच एक कार्यक्रम दूरदर्शनवरून तेंव्हा प्रसारित होत असे. धीरेन्द्र ब्रह्मचारी हा स्वतःच स्मगलिंगमध्ये होता. १९७०-८० च्या दशकात तो इंदिरा गंधींचा निकटवर्ती सल्लागार बनला होता. संजय गांधींच्याही व्रतुळात तो वावरला. आणीबाणीच्या काळात त्याने अमेरिकेतून एक विमान आणले. त्याची कस्टम ड्यूटी चुकवलेली होती. जनता राजवटीत इंदिरा गांधींच्या या योगगुरूचे विमान जप्त केले गेले होते. जम्मूच्या उधमपूर परिसरात त्याचा आश्रम होता. तिथे परदेशी बनावटीच्या बंदुकांचा कारखाना चालवल्याचाही आरोप या स्वामीवर होता. हरयाणातील गुरुग्राममध्ये प्रचंड सरकारी जमीन हडप करून तायने गांधी परिवाराच्या कृपेने मोठा आश्रम बांधला होता. तो जप्त करण्यासाठी नंतर हरयाणा सरकारने कायदा केला पण तरी ते प्रकरण अद्याप न्यायालयातच फिरते आहे. जम्मूत खाजगी विमानाला अपघातात या धीरेन्द्रचा अंत झाला. या गुरु, स्वामी व बुवांनी राजकारणात लुडबुड केली तशीच अनेक बुवांनी आमदार व मंत्र्यांना सल्ले देण्याचे उद्योग महाराष्ट्रात केले. आहेत आजही अनेक आमदार व राजकीय नेत्यांच्या मागे-पुढे एखादा बाबा बुवा असतोच. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर कै. शंकरराव चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तसेच कालांतराने अशोक चव्हाणांच्या कारकीर्दीत स्वामी बुवांच्या पाद्य पूजा पार पडल्या आहेत. आसाराम बापू बलात्काराच्या केस मध्ये तुरुंगात असताना त्याचे देशात तीनशे ठिकाणी आजही सत्संग होतात. त्याची प्रतिमा ठेऊन पूजन केले जाते. बलात्कारी राजकारण्यांना आमदार, खासदार बनवले जाते. तुमच्या आजुबाजूला हजारो खरात फिरत आहेत. एक गेला की दुसरा पैदा होतो. खरात तुरुंगात गेला की दुसरा खरात तयार होणार आहे. ही एक कीड आहे. ती वेळीच चिरडून टाकायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *