हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती
काका पवार यांच्या तालमीला ५० लाखांचे आर्थिक सहाय्य
पुणेः खासदार व कुस्ती श्रेत्राचे आश्रयदाते शरद पवार साहेब यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती तर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल,पुणे या संकुलसाठी ५० लाख रुपयेंचे बक्षिस दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक श्री मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्लांनी पदकाची लयलुट केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे.
शरद पवार यांचे आभार र्व्यक्त करीत काका पवार म्हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्या वेगाने पवार हेच कुस्तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, गुरूवर्य काका पवार यांच्या सल्ल्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
चौकट
शासनाकडून नोकरीचे आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काक पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्यावेळी येत्या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे काका पवार यांनी सांगितले आहे.
