खुशखबर ! २५०० घरांसाठी म्हाडाची लॉटरी ३१ मार्चला

मुंबई : मुंबईत स्वतःचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) लवकरच मुंबईतील २५०० घरांच्या विक्रीसाठी ३१ मार्च २०२६ रोजी लॉटरी जाहीर होणार आहे.

 सोडतीत यंदा ३२ लाख ते ८ कोटींपर्यंत घरांच्या किंमती असणार आहे. मात्र, म्हडाच्या घरांची यंदाच्या सोडतीत कोटीच्या कोटी उड्डाणे अधिक असल्याची चर्चा आहे.

 सर्वाधिक घरे यंदा मध्यम आणि उच्च गटासाठी असणार आहे. पहाडी गोरेगावमधील पीएमएवायची १० घरे सोडता इतर घरांच्या किंमती कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हि घरं घेणं सहज शक्य नसणार असल्याने काही अंशी नाराजी देखील बघायला मिळत आहे. दुसरीकडे पहाडी गोरेगावमधील घरांच्या किंमती अंदाजे ३२ लाख रुपये असणार आहे. ३१ मार्च रोजी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करत नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार, अशी देखील माहिती आहे.

विक्रोळी कन्नमवार नगरमधील १२०० घरं सोडतीत असणार आहे. तर अंदाजे ८० लाख रुपये घरांच्या किंमती ज्यात ८०० चौ. फुटाचे क्षेत्रफळ असल्याची माहिती आहे. पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगरसारख्या ठिकाणी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे.

म्हाडानं  २०२५ मध्ये मुंबईतील घरांची लॉटरी काढली नव्हती. त्यापूर्वी २०२४ मध्ये म्हाडाकडून लॉटरी २००० घरांसाठी काढण्यात आली होती. म्हाडाकडून संगणीकृत पद्धतीनं  विविध उत्पन्न गटातील अर्जदारांच्या यादीनुसार सोडत काढली जाते.

अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार विवाहीत असल्यास पती/पत्नी यांचे आधार कार्ड/ पॅन कार्ड,अर्जदार अविवाहीत असल्यास स्वतःचे आधार कार्ड/पॅन कार्ड.अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र जे जानेवारी २०१८ नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *