लॉकडाऊन लागणार नाही- फडणवीस

मुंबई : देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे लॉकडाऊन लागणार, अशा आशयाचे संदेश ही सफशेल अफवा असून असे कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, तशा आशयाच्या अफवा जर कुणी परसवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार.”

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे १० रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शट डाऊनची परिस्थिती आली आहे. अशा वेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावू नयेत. आपल्याकडे एक महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *