१ ली खेलो इंडिया ट्राइबल स्पर्धा, छत्तीसगड २०२६
जलतरणात महाराष्ट्राची पदक पंचमी
तन्वीला सुवर्णासह १ रौप्य, पलाशला २ रौप्य, भक्तीशला १ कांस्य
रायपुर ः पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी १ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य पदकांची लयलूट केली आहे. नागपूरच्या तन्वी धुर्वेने महाराराष्ट्राच्या सुवर्ण पदकाचे खाते उघडले. तन्वी पाठोपाठ पलाश ठाकुरने पदकांचा डबल धमाका करीत दिवस गाजविला.
ट्राइबल स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. तन्वी धुर्वेने १०० मी. बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण ती १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रूपेरी यशाला गवसणी घातली. पलाश ठाकूरने १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक व ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य पदकाची कामगिरी केली. २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात भक्तीश कुमारे कांस्य पदकाचे यश संपादन केले. खेलो इंडियातील कामगिरीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले व संघाच्या पथकप्रमुख भाग्यश्री बिले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
कर्नाटक व ओरीसा नंतर सुवर्णपदक जिंकणारी महाराष्ट्राची तन्वी धुर्वे ही पहिलीच खेळाडू ठरली. तीने १:२३.६५ सेकंदात शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदकाचा नाव कोरले. मध्य प्रदेशच्या सृष्टि वर्माने रौप्य तर छत्तीसगढ़च्या न्यासा पैकराने कांस्यपदकाची कमाई केली. तन्वीने नुकतीच दहावीच्या परीक्षा दिली असून तीने खेलो इंडियात प्रथमच पदक जिंकले आहे. यशानंतर तन्वी म्हणाली, की “मी गेल्या आठ वर्षांपासून मी सराव करते. माझे वडील, सुखदेव, एक आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असून माझा भाऊ, सार्थक, वॉटर पोलोमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे .
मला माझ्या कुटुंबाकडून महाराष्ट्राच्या मुलांनेही पदकाची कामगिरी केली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात पलाश ठाकूरने ३२.१३ सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले. ३१.०८ सेकंद सर्वोत्तम वेळेत कर्नाटकच्या मणिकांता एलने सुवर्ण पदकाचा पल्ला पार केला. मणिकांताने स्पर्धेत ८ सुवर्ण पदके जिंकाण्याचा पराक्रम केला आहे.
साक्षी बुरकुलेला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण
रायपुर- पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत यवतमाळ च्या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. वेटलिफ्टिंगच्या ८६ किलो गटात सर्वाधिक एकूण १५० किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात साक्षीने ६८ किलो तर क्लिन ॲन्ड जर्क प्रकारात ८२ किलो वजनाची कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले. यजमान छत्तीसगडच्या रूषिका कश्यपने १२१ किलोसह रौप्य पदक जिंकले. ११८ किलो वजनाची कामगिरी करणाऱ्या आसामच्या बितूपूर्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
