मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा
हर्षित माहीमकर उपांत्य फेरीत
मुंबई, २९ मार्च: माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित हर्षित माहीमकरने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर चुरशीच्या लढतीत पिछाडीवरुन विजय मिळवले.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पादूकोण अकादमीद्वारे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला एसव्हीसी सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे.
पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत हर्षितने ओजस गेडामवर 10-15, 15-13, 15-12 असा चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. त्याच्यासह सर्वेश यादव, क्रीत्य पटेल आणि देव रुपारेलिया असा विजय मिळवला.
महिला गटात तिसरी सीडेड श्रेया भोसले आणि दुसरी सीडेड आर्या कोरगावकर यांनी उपांत्य फेरी गाठताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर चुरशीच्या लढतीत पिछाडीवरून मात केली.
निकाल – महिला एकेरी (उपांत्यपूर्व फेरी): ३-श्रेया भोसले विजयी वि. केतकी थिटे १२-१५, १५-१०, १५-९; २-आर्या कोरगावकर विजयी वि. ७-अनन्या शिंदे ९-१६, १६-१४, १५-४.
पुरुष एकेरी (उपांत्यपूर्व फेरी): हर्षित माहीमकर विजयी वि. ओजस गेडाम 10-15, 15-13, 15-12; 3-सर्वेश यादव विजयी वि.आर्यन इपटे 15-10, 15-8; क्रीत्य पटेल विजयी वि. श्वेतांक कर्णिक 15-10, 18-16; देव रुपारेलिया विजयी वि. अजय मीना 7-15, 15.
