एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न

कल्याण: एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा महाविद्यालयाच्या वातानुकूलित प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर  अमर लुंड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटचे जनरल मॅनेजर संजीव बजाज तसेच सुप्रसिद्ध मेंटर आणि उद्योजक सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरस्वानी आणि प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांचेही मार्गदर्शन लाभले.

अध्यक्ष डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाशी असलेले नाते पुढेही टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मेंटर  सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.

समारंभात विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान समारंभाचा पोशाख परिधान करून पदव्या स्वीकारल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करत महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव केल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *