ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी

ठाणे:  ठाणे-पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम व त्यासाठी लागणाऱ्या मतदार यादीचे काम चालू झालेले आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये मतदार यादी कायम होऊन नवीन यादी जाहीर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महानगरपालिका येथे महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, महाराष्ट्र सहकार बोर्डाचे संचालक अरुण पानसरे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे, नगरसेवक बाबाजी पाटील व शिवसेना पक्षाचे सन्मा नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेन पक्ष ज्या पध्दतीने महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण करत आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रगण्‌य आहे असे मानले जाते. सहकाराच्या माध्यमातून जिल्हयातील सहकार क्षेत्रामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे सर्व दृष्टीने एकत्र येवून ठाणे जिल्हा मध्यवर्ती व पालघर जिल्हा मध्यवर्ती निवडणूक लढवावी अशा प्रकारचे साकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे मांडण्याबाबतची भूमिका घेतली आहे.

या संदर्भात मतदार यादी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे व पतसंस्थांचे ठराव किंवा पुढील प्रक्रिया राबविण्याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये ठाणे शहरातील सर्व सन्मा. नगरसेवकांना त्याच्या प्रभागामध्ये असणाऱ्या गृहनिर्माण संस्था व पतसंस्था यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नियमाप्रमाणे जो ठराव लागतो तो ठराव 5 तारखेच्या आत अनिल भोर, खांडेकर व ज्ञानेश्वर गायकवाड समन्वयक म्हणून त्यांचेकडून देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.

सर्व पदाधिकारी, ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेबरोबर निवेदनाद्वारे चर्चा करतील व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *