सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र
प्रक्रिया बिनविरोध, राऊळ, नारकर,साटविलकर, तांबे यांची वर्णी
राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. कट्टर राणे समर्थक भाजपाचे प्रितेश राऊत( शिक्षण व आरोग्य) आणि सुलोचना नारकर (महिला व बालकल्याण) तर शिंदे शिवसेनेचे संतोष साठविलकर (वित्त व बांधकाम )आणि रुहिता तांबे( समाज कल्याण) यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. या निवडीत खासदार नारायण राणे यांनी जुन्या नव्या सदस्यांना संधी दिली आहे.
रेडी वेंगुर्ले इथून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सुलोचना नारकर या पोंभुर्ले (देवगड ) जि. प.गटातून निवडून आल्या आहेत. शिंदे सेनेचे साटविलकर हे मालवण तालुक्यातील पेंडूर जि. प. गटातून निवडून आले आहेत. तर रोहिता तांबे या जानवली (कणकवली) या जि. प. गटातून निवडून आल्या आहेत.
निवडीनंतर जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जय प्रकाश परब,उपाध्यक्ष दादा साईल शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मनीष दळवी शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे गटनेते संजय बोबडी यांनी बिनविरोध निवड झालेल्या सर्व सभापतींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
