योगेश चांदेकर
पालघर- डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील पांचाळ समाज सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महिला ही अबला नसून ती माता लक्ष्मी, सरस्वती, जगदंबा, दुर्गा, चंडिका, रणचंडी चे रूप आहे. महिला सक्षमीकरण महिलांचा सन्मान, समान हक्क, त्यांचा अधिकार आहे. आई , बहीण, सून, मैत्रीण, पत्नी, अशा विविध भूमिका ती निभावत असते, आणि आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला आधार देत असते, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले. या महिला मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राज्यमंत्री मनीषा ताई निमकर, वैदही वाढाण, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, तालुका प्रमुख रवी चौधरी, संजय चौधरी, शिवसेना युवा प्रमुख साइराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, शहर महिला संघटिका दीपा पमाळे, भारती सावे, नीलम म्हात्रे, सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा सेने पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
