अनिल ठाणेकर
मुंबई, प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सागर जोंधळे आणि अनीता म्हात्रे, ‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचे मालक म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही प्रतिष्ठित स्पर्धा ३१ मार्च २०२६ पर्यंत सुंदर उमियम वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे.
या लीगमध्ये एकूण १४ टीम्स, १८२ सहभागी, ८ देश आणि ५८ आंतरराष्ट्रीय सेलर्स सहभागी झाले आहेत जे या स्पर्धेचा जागतिक दर्जा आणि भव्यता दर्शवतात. ‘मुंबई मेरिडियन्स’ टीमची खासियत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधता. या टीममध्ये रशिया, मलेशिया आणि मुंबई येथील उत्कृष्ट खेळाडू सहभागी आहेत, जे एकत्र येऊन जागतिक स्पर्धात्मकता आणि टीमवर्क दाखवत आहेत. प्रशिक्षक, वर्ल्ड चॅम्पियन कोच विकास कपिला यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि एशियन चॅम्पियन टीम मॅनेजर शिल्पा ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली, सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज आहोत. ‘मुंबई मेरिडियन्स’ ही केवळ एक टीम नाही ती एक मिशन आहे. ‘मुंबई मेरिडियन्स टीमला सपोर्ट करा, आणि चला एकत्र येऊन भारताला जागतिक नौकानयन मंचावर उजळून टाकूया.भारतामध्ये नौकानयन खेळाला नवीन उंचीवर नेण्याचं, आणि युवा पिढीला या साहसी खेळासाठी प्रेरित करण्याचे सर्व क्रीडाप्रेमींना आणि देशवासियांना आवाहन सागर जोंधळे यांनी केले आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *