मुंबई- मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत  स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर( एक्सर सुविद्या शाळा), एक्सर रोड, बोरीवली पश्चिम येथे   मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट कै. दत्ताराम दुदम सरांना समर्पित “अजिंक्यतारा चषक”  मल्लखांब स्पर्धा सलग ५व्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सु.प्र.संघाचे अध्यक्ष व कर्ममूर्ती महादेव गोविंद रानडे सरांचे अमृतमहोत्सवी वर्ष देखील साजरे करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील ५० संस्थांमधून ९०० पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत  सहभागी होणार आहेत. ६/८/१०/१२/१४/१६/१८ वर्षांखालील मुले आणि मुली असे खेळाडूंचे वयोगट आहेत मल्लखांब खेळातील एकमेव पॅरा मल्लखांब वयोगटातील स्पर्धा  देखील‌ या वेळी‌ घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूस अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल .तसेच प्रत्येक वयोगटात वैयक्तिक पदकं, सांघिक चषक अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सुविद्या प्रसारक संघाचे सचिव मिलिंद जोशी, स्पर्धा सचिव संचिता देवल,  आशिष देवल व दुदम सरांचे विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबई उपनगरात‌  ही भव्य स्पर्धा संपन्न होणार  आहे.स्पर्धेच्या आधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख आशिष देवल, मो.क्र.  ९६६४००२०५१ यांच्यांशी संपर्क साधावा.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *