दंगेखोरांनो खबरदार… दंगा कराल तर यापुढे महाराष्ट्रतही बुलडोजर चालणार…

मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर परिसरात काल हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करून दंगल करणाऱ्या ८ दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या बेकायदा बांधकाम आणि घरांवर महानगरपालिकेने बुलडोजर चालविला. (संबधित वृत्त आतील पानावर )

मुंबईत दंगेखोरांच्या घरावर बुलडोझर ; 8 जणांना अटक

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये दोन गटात झालेल्या दंगलीनंतर या घटनेतील दंगेखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर आणि घरांवर कारवाईचा बडगा उगारत बुलडोजर चालवण्यात आले.

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने दिंडोशी संतोष नगर परिसरातील दंगेखोरांच्या अनधिकृत घरांवर जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली. हि घरं अनधिकृत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर हि कारवाई करण्यात येत असल्याचे बोललं जात आहे. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, दिंडोशी संतोष नगर परिसरात मरियम्मा देवीचा शोभायात्रा दरम्यान, काल रविवार ५ एप्रिलरोजी संध्याकाळच्या सुमारास राडा झाला. दोन गटात झालेल्या या वादानंतर तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीय. या हाणामारीत तिन ते चार जण गंभीर तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.  दरम्यान, या प्रकरणी 8 जणांना दिंडोशी पोलिसांनी मध्यरात्री अटक केलीय. संतोष नगर परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडला.

बजरंग दलाचा कार्यकर्तांकडून काल पोलीस आणि बीएमसीकडे मागणी करण्यात आली होती, कि ज्या आरोपीने मरियम्मा माता यांच्या शोभायात्रेवर हल्ला केला त्यांच्या अनधिकृत दुकान आणि घरांवर कारवाई करण्यात यावी. यानंतर आज पालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली. काल संध्याकाळी मरियमा मातेची शोभायात्रा या परिसरात काढण्यात आली होती. या शोभायात्रामध्ये राम यांचं जोरात गाणं वाजत असल्यामुळे दुसरा गटाकडून विरोध करण्यात आला. यानंतर दुसरा गटाकडून हिंदू शोभायात्रेमध्ये तलवार, लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. यामध्ये बजरंग दलाचे तीन कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहे. सर्वांवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत. अशी माहिती बजरंग दल कोकण प्रांतचे सहसंयोजक गौतम रावारीया यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *