मुरबाड पश्चिम राखीव वनक्षेत्रात वारंवार राजरोस वृक्षतोड
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील मोहघर वनपरीमंडळ पश्चिम क्षेत्रात राखीव वनांची राजरोसपणे वारंवार तोड होत असून वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची चर्चा आहे. मुरबाडच्या पश्चिम क्षेत्रात मोहघर राउंडमध्ये पाटगाव परिसरात वनजमिनीवरील खैर जातीचे वृक्ष मोठया प्रमाणात तोडले गेले आहेत. मागील सात आठ महिन्यापुर्वी याच ठिकाणी शेकडो खैर तोडून ते चोरट्यांनी विकले. आता याच ठिकाणी पुन्हा खैर तोडले आहेत.वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची परिसरात चर्चा आहे. हे खैर चोरटे अधिकाऱ्यांना माहित आहेत, अशीही वनविभागात व परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. हा खैर चक्क कटिंग मशीन लावून राजरोसपणे तोडलेला आहे.या कटिंग मशीन लाकूडतोड व्यवसायीकांकडे मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे हा खैरचोर लाकूडतोड व्यवसायिक असावा असा अंदाज आहे. त्यात खैर प्रकाराची वृक्षतोड प्रकरणे कुणी केली आहेत. याचा शोध घेतल्यास या खैर चोरांचा तपास लागू शकतो. मागील वेळी हा खैरचोर पकडला होता, मात्र मोठी तडजोड करुन चोरटयांना सोडण्यात आले. मुरबाड मोहघर वनपरीमंडळ पश्चिम क्षेत्रात राखीव वनांची राजरोसपणे वारंवार तोड होत असून वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *