विधान भवनात अभिवादन
मुंबई, (प्रतिनिधी ) : महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दीवर्ष प्रारंभानिमित्त आज शनिवार, ११ एप्रिल, २०२६ रोजी विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव शिवदर्शन साठ्ये व उप सचिव विजय कोमटवार, उपसभापतींचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
